पिंपरी – संगीत, कला, नृत्य, वादन हा आपल्या सर्वांचाच आवडीचा विषय आहे. संगीताच्या मैफिलीत मन रमून गेलं की आतापण मंत्रमुग्ध होतो. असचं आपल्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यात आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात स्वर मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “मेलोडी मॅजिक ऑफ शंकर जयकिशन जी” असे या कार्यक्रमाचे नाव आहे. यावर तुम्हाला समजलच असेल या कार्यक्रमात सुरेल आवाज शंकर जयकिशनजी यांचा असणार आहे. हा कार्यक्रम १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘गदिमा सभागृह, निगडी प्राधिकरण मध्ये हि सुरेल मैफिल रंगणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी प्रत्येक रसिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतो. या कार्यक्रमाला कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि प्रस्तुती गणेश देशपांडे यांनी केली आहे. गणेश देशपांडे यांचा थोडक्यात परिचय म्हणजे ते छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध निर्माते आणि निर्देशक आहेत. त्यांनीच आपल्या या कार्यक्रमाची रूपरेषा पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केली.
या कार्यक्रमाचे निवेदन मनीष गोखले करणार आहेत. या मैफिलीला आणखी रांगतदार बनवण्यासाठी सतीश इंगळे, मौतुषी दास, मनीषा निश्वल आणि वंडरबॉय पृथ्वीराज आपल्या सुरेल आवाजांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. तसेच या कार्यक्रमाला आपल्या वादनातून मंत्रमुग्ध करण्यासाठी अमान सय्यद, चिंतन मोढा, प्रसाद गोंदकर, विशाल गंड्रतवार, सचिन वाघमारे, हार्दिक पटेल, ऋतुराज कोरे हजेरी लावणार आहेत.












