लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसे सगळ्या राजकीय पक्ष्यांच्या हालचाली वाढल्या आहे. राज्यात मागील काही दिवसांन मध्ये अनेक राजकीय उलथा पालथं झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यामध्ये आज शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत प्रकाशन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी निलेश लंके यांचं स्वागत केलं.
पण शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी निलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिला का? या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? हे समजणं कठीण होऊन बसलं आहे.निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी कोरोना काळात मोठं काम केलं. त्यांच्या कोरोना काळातील अनुभवाविषयी त्यांनी ‘मी अनुभवलेला कोविड’ अशा नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी शरद पवारांनी निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेच्या जागेतून उमेदवारी जाहीर करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण याबाबत दोन्ही नेत्यांनी काहीच भाष्य केलं नाही. याउलट आपल्या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली












