दि १७ पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आज वकील बार रूम मध्ये इयत्ता १०वी व १२ वी मध्ये ८० ℅ पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा पिंपरी नेहरूनगर न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मा.वानखेडे साहेब तसेच न्यायाधीश गिरी साहेब, न्यायाधीश मोरे साहेब, न्यायाधिश गजभिये साहेब व बार असोसिएशनचे अध्यक्ष नारायण रसाळ सर ,मा .अध्यक्ष अँड दातीर पाटील सर, अँड सुहास पडवळ सर, अँड सुदाम साने सर,अँड विलास कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाचे सूत्र संचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या विदयमान उपाध्यक्षा अँड जयश्री विलास कुटे यांनी केले, व सर्वांचे आभार अँड प्रशांत बचुटे यांनी मानले,याप्रसंगी १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेला कु निलांजन चंद्रकांत माने, कु तन्मय गजानन धायगुडे, कुमारी जान्हवी विजय रोडे, कुमारी श्रावणी विनोद काळभोर, कु निल सचिन राऊत, कु तनिष्का धमाजी लांडगे,कु नेहा दिलीप शिंगोटे,कु.व्हिक्टोरिया बिटो जॉन,कु सिद्धेश जयदीप सिसोदिया ,कु कार्तिक महेश भापकर,कु .हर्षवर्धन वैभव मोहिते,कु.श्रुती सत्यन नायर,कु निहिरा सुनील कडूसकर,कु दुरप्श| समशेर मोमीन,कु श्रेयस संभाजी कुंभार या सर्व विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ,या कार्यक्रमात वकिलांच्या गुणवंत मुलांचे सत्कार केल्याबद्दल न्यायाधीशांच्या वतीने बार असोसिएशनचे कौतुक करण्यात आले ,या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुसंख्येने वकील बंधू भगिनी तसेच ॲड अल्पना रायते व ॲड अरुण खरात उपस्थित होते तसेच सचिव अँड गणेश शिंदे, महिला सचिव अँड प्रमिला गाडे, सह सचिव अँड मंगेश नढे ,हिशोब तपासनीस अँड राजेश रणपिसे, सदस्य अँड स्वप्नील वाळुंज, अँड सौरभ जगताप, अँड अक्षय केदार, अँड नितीन पवार, अँड पवन गायकवाड उपस्थित होते.
पिंपरी नेहरूनगर न्यायालयात झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार












