पुणे | प्रतिनिधी
येरवडा, दि.२० : कारागृहातील गुन्ह्याच्या प्रकरणा मध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.अलीकडेच येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक गुन्हे घडले असून अजून एक गुन्हा समोर आल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी हेमंत इंगोले वय ३३, तुरुंगाधिकारी येरवडा मध्यवर्ती कारागृह,पुणे असे फिर्यादीचे नाव असून १५ न्यायालयीन बंदींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही घटना दि.१९ रोजी १०:०० ते १०:३० च्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्र.३ परिसर, बरॅक क्र.८ येथे घडली आहे.
न्यायालयीन बंदींमध्ये पूर्ववैमनस्यातून तसेच वर्चस्ववादातून वाद झाला.त्यातून त्यांनी एकमेकांना दगड पत्र्याचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकमेकांना जखमी केले आहे.
आरोपींवर भादंवि कलम ३२४,३२३,१४३,१४४,१४७,१४८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे हे करत आहेत.












