पुणे, 23 जून 2023: पुण्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येणार आहे कारण भारतीय हवामान विभागानुसार, 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय २४ जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे.
पुणेकरांनो पाऊसाची प्रतीक्षा संपली : 25 आणि 26 जून रोजी पुण्यात मुसळधार पाऊस












