पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ :सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य असणा- या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँ केच्या तज्ञ संचालकपदी प्रसिद्ध चार्टड अकौंटंट दत्तात्रय बाळाजी खेमनर व अॅड. मासूम (मुन्ना) उमर सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
गौतम सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय सं चालक मंडळाची मासिक सभा नुकतीच गौतम बँकेच्या सभागृहात पार पडली. या मासिक सभेत 2023 ते
2028 या पंचवार्षिक कालावधीसाठी तज्ञ संचालकांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या आहेत. यामध्ये व्यवसायाने चार्टड अकौंटंट असलेले प्रसिद्ध चार्टड अकौंटंट दत्तात्रय खेमनर व वकिली व्यवसायात प्रसिद्ध असलेले अॅड. मासूम (मुन्ना) सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या नूतन संचालकांचे बँकेचे मार्गदर्शक मा जी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे, बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, व्हा.चेअरमन बापूराव जावळे तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी अभिनंदन केले आहे.












