पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.२८ : सासू बरोबर भांडण केल्यामुळे एका इसमाला जीवघेणी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
प्रवीण जाधव ( वय ३४, रा.सहकार नगर, पुणे ) असे फिर्यादीचे नाव असून एकूण सोळा इसम आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत अण्णा भाऊ साठे वसाहत, सहकार नगर येथे थांबले होते.तेव्हा आरोपी हे तेथे आले आणि फिर्यादी यांच्या मित्रास तू माझ्या सासू बरोबर भांडण करतोय काय असे म्हणत जाब विचारला.फिर्यादी यांना तुम्ही सुधरा नाहीतर एक एकाचा मर्डर करेल अशी धमकी देत लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून १,००० रुपये काढून घेतले.
रोडला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत सर्व आरोपी हे लोकांच्या अंगावर धावून गेले.तसेच मी या एरियाचा भाई आहे मला कोण आडवे येईल त्याला मी कापून टाकेल असे बोलून लोखंडी हत्यार हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण केली.
सर्व आरोपींवर भादवी कलम ३९५,३२३,४५२,१४३,१४४,१४७,१४८,१४९,४२७,५०४,५०६ ( २ ) महा.पो.का.क. ३७ ( १ ) १३५,आर्म ॲक्ट ४ ( २५ ),क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट क.३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे हे करत आहेत.












