बीडचे सुपुत्र शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे यांची जयंती आज आहे. स्व.विनायकराव मेटे यांनी शिवसंग्रांमच्या माध्यमातून मराठा समाजासाठी अनेक कार्य केले होते.
या जयंतीनिमित्त बीड शहरात जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता हा कार्यक्रम त्यांच्या स्मृती स्थळ बीड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. यामुळे देवेंद्र फडवणीस जयंतीनिमित्त भाषणात कोणते मुद्दे मांडणार याकडे बीड करांच लक्ष आहे.












