पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : अनेक सावकार अवाढव्य व्याज लावून कर्जावर पैसे देत असतात. आणि पूर्ण रक्कम भेटल्यानंतरही अधिक रकमेची मागणी करतात अशा दोन घटना पुणे परिसरात घडल्या आहेत
पहिली घटना ही रविवार पेठ येथे घडली आहे फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार सावकार यश संजय मेमाने व मानव संजय मेमाने ( रा.न्यू रविवार पेठ पुणे ) यांना खडक पोलिस स्टेशनने अटक केली आहे.
फिर्यादी यांनी आरोपींकडून एकूण १,९०,००० रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेऊन त्या बदल्यात त्यांचा मारुती सुझुकी टेम्पो आरोपीकडे गहाण ठेवला होता. त्यानंतर फिर्यादीने आरोपींना गुगल पे व रोख स्वरूपात एकूण १,७०,००० रुपये व्याज देऊन गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला. पण आरोपींनी टेम्पो परत न देता फिर्यादी यांच्याकडे २,००,००० अतिरिक्त रकमेची मागणी केली.फिर्यादी यांनी अतिरिक्त रक्कम दिली नाही म्हणून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडचे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच काढून घेतले.
दुसरी घटना शनिवार पेठ परिसरात घडली आहे. सुरज मनोज परदेशी ( रा.गुजरवाडी, कात्रज ) याच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी यांनी होम लोन व माॅरगेज लोन चा व्यवसाय सुरू करण्यासाठी विनापरवाना सावकारी करणाऱ्या सावकाराकडून एकूण ४५,००० रुपये दरमहा वीस टक्के व्याजाने घेतले.त्यानंतर फिर्यादीने आरोपीला गूगल पे,फोन पे आणि रोख स्वरूपात एकूण ४,५०,००० रुपये दिले.तरीदेखील आरोपी फिर्यादींना १,५३,००० अतिरिक्त रकमेची मागणी करत होता.फिर्यादी यांनी अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी फिर्यादींना वारंवार फोन करत शिवीगाळ करत बदनामी करण्याची धमकी देत होते.
दोन्ही घटनेतील आरोपींवर भादवी कलम ३८४,३८५,महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९,४५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा.पो.निरी. चांगदेव सजगने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.












