पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. ५ : खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, मुबलक प्रमाणात होण्यासाठी व शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुण नियंत्रणचे कृषि संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.
स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी २४ तास सूरू राहणार असून संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वणी क्रमांक ८४४६११७५००, ८४४६२२१७५० व ८४४६३३१७५० उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकाही संपर्क करता येईल. यासोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ईमेल पत्त्यावरही पाठविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.












