पुणे ता. 7 : वारजे येथील रामनगर परिसरात पहाटेच्या वेळी पाच अनोळखी इसमांनी दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवार (दि.६) रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, फैसल सय्यद यांनी वारजे पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
अन्वर शेख (रा.कात्रज), कमलेश रटे (रा.सदर), बबलू खान (रा. सदर), शोएब खान (रा. सदर) असे ताब्यात घेणात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी हे बर्थडे पार्टीसाठी खान वस्ती येथे आले होते. रात्री अकरा वाजतेच्या सुमारास कार्यक्रम संपल्या नंतर आरोपी रात्रभर तिथेच थांबले.
पहाटेच्या सुमारास सर्वजण दारूच्या नशेत असताना, दोन कार व एक पिकअप या वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास अंमलदार कदम करीत आहेत.
वारजे परिसरात वाहनांची तोडफोड












