
पुणे ता ८ : पुणे पोलिसांकडून शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवून 1994 गुन्हेगारांनाची झाडा झाडती घेण्यात आली असून त्यापैकी 695 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी दि.७ रोजी रात्री दहा ते शनिवार दि ८ रोजी एक वाजे पर्यंत पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे. यावेळी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार व पोलीस सहा.आयुक्त संदीप कर्णिक, पुणे शहर यांनी स्वतः ऑल आउट ऑपरेशन मध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले. ऑपरेशनमध्ये एकुण १२९ कारवाया करण्यात आल्या असून तब्बल १६५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमे दरम्यान आर्म ऍक्ट गुन्ह्यामध्ये २४ आरोपी अटक करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याकडून एक पिस्टल व तेवीस धारदार हत्यारे असा एकूण ६७ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यामध्ये पुणे पोलिसांनी मपोका केस अंतर्गत 5 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तसेच प्रोव्हिबिशन केस अंतर्गत ७३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर एनडीपीएस च्या तीन कारवाई करण्यात असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपींकडून 40 ग्रॅम गांजा तीन किलो 515 ग्रॅम बंटा, सहा किलो 167 ग्रॅम अफिम व मोबाईल असा एकूण एक लाख पंच्याहातर हजार आठशे पंचावन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार ऍक्ट अंतर्गत २३ कारवाई करण्यात आली असून ५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीण पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 संदीप सिंह गिल, उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच वाहतूक विभागाकडील अधिकारी यांच्या पथकाने संयुक्तपणे हि कामगिरी केली आहे.
ऑल आऊट ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई












