पुणे : वानवडी परिसरात विविध ठिकाणाहून मोबाईल हँडसेट गहाळ झाल्याची तक्रार वानवडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या होत्या. या गहाळ झालेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन हरवलेले मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले आहे. एकूण दोन लाख वीस हजार किंमतीचे १६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात वानवडी पोलिसांना यश आलेले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधीत तक्रारदार यांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले आहेत.
मोबाईल हरविल्यानंतर त्यांची तक्रार पुणे पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अँड फाऊंट वर तसेच शासनाचे CEIR या पोर्टवर तात्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परि.-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, व तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक संतोष सोनवणे सायबर तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक सोनालिका साठे, पोलीस हवालदार अतुल गायकवाड, राहुल गोसावी, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड, निळकंठ राठोड, सुजाता फुलसुंदर, सोनाली वाकसे यांनी केली आहे.
वानवडी पोलिसांकडून १६ गहाळ मोबाईल नागरीकांना सुपर्त.












