पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१० : केशव नगर परिसरात राहणारी आठ वर्षीय मुलगी संद्याकाळच्या सुमारास हरवली होती. दरम्याम
एक लहान मुलगी रडत असल्याचे पाहून सदर परिसरात राहणाऱ्या नीलकंठ शरणाप्पा माणिक शेट्टी यांनी मुंढवा पोलिस स्थानकात लहान मुलीसह धाव घेतली होती. या घटनेची तात्काळ दाखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी मुलीच्या आई वडिलांचा शोध सुरु केला.
सदर तपास पथकाने चिमुकलीला घेऊन केशव नगर परिसरात नागरिकांकडे चौकशी केली असता, लहान मुलगी सिमरन ऊर्फ पुतुन मिथलेश राय रा. नागपूर चाळ,केशव नगर, मुंढवा येथे आई व आजी सह राहण्यास आल्याची माहिती मिळाली. सदर चिमुकलीच्या आई व नातेवाईकांचा रात्री एक ते दीड तास शोध घेतल्या नंतर चिमुकलीचे घर सापडण्यात यश मिळाले. चिमुकलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
चिमुकलीच्या आई व आजीने तसेच परिसरातील नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले. पोलिसांचे तत्पर कामगिरी बदल सर्वत्र कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परी-५ श्रीकांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त अश्विनी राख,यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, पोलीस उप निरीक्षक कोळेकर , पोलीस अंमलदार दीपक कांबळे, सचिन बोराटे, दयानंद गायकवाड यांनी केले आहे.












