पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.14 : संभाजीनगर परिसरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचून गजा आड केले आहे. गुन्हेशाखा २ चे युनिट वारंवार प्रयत्नाने तसेच बातमीदाराच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
गुन्हेशाखा युनिट २ च्या पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना बातमीदार माहिती मिळाली कि . तीन इसम स्प्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच १४ बी डब्लू ७०५३ या वरून संभाजीनगर परिसरात मोबाईल विकायचे सांगून फिरत आहे. ही माहिती समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रोटरी क्लब चौक संभाजीनगर या ठिकाणी जाऊन सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले आहे . सदर आरोपींची चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे.
राज (उर्फ) नण्या आनंद लष्करे (वय १९), केशव उर्फ ओम किशोर अलंकार (वय १९ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सदर आरोपींकडून ६ मोबाईल तसेच गुन्ह्या मध्ये वापरली जाणारी मोटार सायकल असा एकूण दीडलाख रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.












