पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १७ : जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या परराज्यातील दोन महिलांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे.ही घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
आरोपी महिला या मॉडेल कॉलनी येथे जूने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरोघरी फिरत होत्या.फिर्यादी यांच्याकडे जूने कपडे विक्रीसाठी होते त्यामुळे त्यांनी कपडे खरेदी करण्यासाठी आरोपी महिलांना घरात बोलावले.आरोपी महिलांनी आम्हाला जेवण मिळेल का असे विचारले असता फिर्यादी महिलांनी त्यांना जेवण दिले.त्यानंतर कपड्यांची खरेदी करून आरोपी महिला या निघून गेल्या.
आरोपी महिला या फिर्यादी महिलेच्या घराजवळ त्या बाहेर पडायची वाट बघत लपून बसल्या.त्या घराबाहेर पडल्या नंतर आरोपी महिलांनी त्यांच्या घरातील दोन सोन्याच्या अंगठ्या,एक मोबाईल व ६०,००० रोख अशी एकूण १,२०,००० रुपयांची चोरी केली.पोलिसांनी बातमी दारातर्फे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलांना सासवड येथून ताब्यात घेतले.
आरोपी महिलांवर भादवी कलम ३८०,३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निसार शेख हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, पुणे, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे, श्री. वसंत कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. विक्रम गौड, सहा पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक निसार शेख, पोलीस अंमलदार, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांनी केली आहे.












