पुणे : धीरज घाटे यांची पुणे शहर भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने ही घोषणा केली आहे. धीरज घाटे हे माजी सभागृह नेते होते. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहराध्यक्षपदासाठी धीरज घाटे यांच्या नावाची चर्चा असून, कार्यकर्त्यांनी घाटे यांचे नाव फायनल केल्याचे बोलले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, माजी आमदार जगदीश मुळीक यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपून जेमतेम वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नगराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू होती.
तसेच शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, यांच्यासह काही जण इच्छुक होते. आज सकाळी प्रदेश कार्यालयाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड यादी जाहीर केली आहे. पुणे शहर अध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप, पुणे ग्रामीण अध्यक्षपदी वासुदेव काळे, मावळसाठी शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
धीरज घाटे यांची पुणे शहर तर शंकर जगताप यांची पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी नियुक्ती












