पुणे : मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर आम आदमी पार्टी (आप) संतप्त झाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दोन मुलींची नग्न अवस्थेत परेड करण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण देश संतप्त झाला आहे.
‘आप’ने भाजप सरकारला पुढील कारवाई काय असा सवाल केला आहे. ते काही कारवाई का करत नाहीत? “महिलांचे अस्तित्व बदलले आहे का? अगदी महाभारतातील द्रौपदीपासून ते आजच्या स्त्रियांपर्यंत काहीही बदलले नाही. सध्याच्या सरकारकडे सर्व अधिकार असूनही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी कोणतीही कठोर कारवाई केली नाही. आज या महिलांसारखी आणखी 225 प्रकरणे आहेत, 365 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हा फक्त एक व्हिडिओ आहे. असे अनेक व्हिडिओ आहेत. तरीही कारवाई होत नाही.” पंतप्रधान मोदी आज आले आणि त्यांनी या घटनेबद्दल दुःखी असल्याचे शांतपणे सांगितले. मग आज त्यांना वाईट वाटत असेल तर गेल्या दोन महिन्यांत त्या महिलांचे काय झाले? त्यांना मागील दोन महिने वाईट वाटले नाही? असा प्रश्नही यावेळी “आप”च्या कार्यकर्ता यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
या वेळी आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाओ देश बचाओ’च्या घोषणा दिल्या आणि ‘काश प्रधान मंत्री को बेटी होती’ असे फलक देखील लावले होते.












