पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : पिंपरी परिसरात बालविवाहातून मुलगी गरोदर राहिल्याची घटना समोर आली आहे.ही घटना पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
राजू ठाकूर ( संग्राम हौसिंग सोसायटी, नेहरूनगर,पिंपरी ),बापू शिंदे ( संग्राम हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी ), गणेश शिंदे ( संग्राम हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी ) आणि दोन आरोपी महिला व इतर नातेवाईकां विरुद्ध एका महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हीचे वय लग्नाच्या वेळी १६ एवढे होते.हे माहीत असूनही वडील राजू ठाकूर व आई यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न गणेश शिंदे यांच्याशी लावून दिले.लग्नानंतर तिची ईच्छा नसताना पतीने शारीरिक संबंध ठेवले ज्यामुळे ती अल्पवयीन असताना गर्भवती राहिली आहे.
सर्व आरोपींवर भादवी कलम ३७६ ( २ ) ( एन ), बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१७ बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९,१०,११ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गिरी हे करत आहेत.












