पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ :पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची नोंद होत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात कहर झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका धक्कादायक घटनेत एक व्यक्ती दलदलीत पडल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी परिसरात शाळेच्या मागे असलेल्या दलदलीत एक व्यक्ती अडकला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे.
नीलकंठ पाटील असे या दलदलीत अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीलकंठ हे त्यांच्या घराजवळील शाळेच्या पाठीमागील रस्त्याने पायी जात होते. मात्र अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दलदलीत तो अडकले. ही घटना पाहिल्यानंतर विशाल साळवे यांनी ही माहिती निगडी अग्निशमन विभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नीलकंठ पाटील यांची दोरी, शिडी, हुक यांच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली.












