
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : पुणे परिसरातील ११ जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
मयुर रंगनाथ आरडे ( वय २२, रा. तळजाई वसाहत पद्मावती पुणे ), ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे, ( वय २३, रा. तळजाई वसाहत पद्मावती पुणे ), रोहन ऊर्फ गायसोन्या राजु आरडे ( वय २१, रा. तळजाई वसाहत पद्मावती पुणे ), आदित्य ऊर्फ सॅण्डी पद्माकर डाकले ( वय २०, रा.पद्मावती, पुणे ), आकाश मनोज डाकले ( वय २३, रा. पद्मावती पुणे ), अनिकेत ऊर्फ गुड्डु रविंद्र शिंदे ( वय २४, रा. पद्मावती, पुणे ), वृषभ शंकर कांबळे ( वय २३,रा. तळजाई वसाहत पद्मावती पुणे ), जयेश ऊर्फ जयडया दत्ता ढावरे ( वय १९ वर्षे रा. तळजाई वसाहत पद्मावती पुणे ) अशी आरोपींची नावे असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.
दि.०५ रोजी फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत लुकड शाळेजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी सर्व आरोपी आरडा ओरडा करीत तेथे आले. त्यांच्यापैकी काहींच्या हातात लाकडी दांडकी व काठया होत्या.तसेच मयुर आरडे नामक आरोपीकडे लोखंडी धारदार हत्यार होते. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत नागरीकांमध्ये दहशत निर्माण केली. तेथील टपरी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन फिर्यादी यांचे मित्रास धारदार लोखंडी हत्याराचा धाक दाखवत खिशातील पाकीट काढून घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर रंगनाथ आरडे नामक आरोपीने नव्याने आपली टोळी तयार केली आहे. तसेच गुन्हे घडवून आणण्यासाठी अल्पवयीन मुलांचा मोठया प्रमाणात वापर करत असुन मागील ५ वर्षां पासुन गुन्हेगारी कारवाया करण्यात सक्रिय आहे. त्याच्या व त्याच्या साथीदारांवर अनेक गंभीर प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे.
आरोपींवर भा.द.वि. कलम ३९५,१४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, ४२७ आर्म अॅक्ट क.४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सार्वजनिक संपत्ती क्षती निवारण अधि. १९८४ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.इतर दोन अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा.पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री नारायण शिरगावकर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि २. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गजेंद्र माळाळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संदिप देशमाने सर्व्हेलन्स पथकाकडील पोलीस अंमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पुजा तिडके, भाऊसाहेब आहेर यांनी केली आहे.











