पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२४ : लोणी काळभोर परिसरात दासवे वस्ती येथे तीन किराणा मालाच्या दुकानावर एका अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार (दि.२२) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी दुकान मालक गणेश कड यांनी लोणी काळभोर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
या तिन्ही दुकानात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने शटरचे लॉक तोडून तेजस सुपर मार्केट मधील आठ हजार नऊशे रुपये,व संस्कृती जनरल स्टोर मधील सात हजार नऊशे रुपये, तर साधना प्रोव्हिजन स्टोर मधील सात हजार नऊशे रुपये असा तिन्ही दुकानातील एकूण तेवीस हजार आठशे रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस स्थानकात भा.द.वि कलाम ४५७,३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक घोडके करीत आहेत.
किराणा मालाच्या तीन दुकानावर चोरट्याचा डल्ला












