पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : जुनी आर्थिक वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
रोहन पवार ( वय २१, रा.शेलारचाळ येरवडा ) याने चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक 22 रोजी फिर्यादी हे मंगलदास रोडवरील कॅनॉट प्लेस येथील कॅफे चिझी क्रिमिक हॉटेलच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरोपी यांनी जुन्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांना लाथा – बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या वडिलांसोबत ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेले असताना हॉस्पिटलच्या बाहेर आरोपींनी तू कोणावर हात उचलला आहेस हे तुला माहित आहे का असे म्हणत धमकी दिली.
आरोपींवर भादवि कलम ३२३,३२४,५०६,३४ गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहेत.












