पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : चोरांनी देवाच्या देव्हाऱ्यात चोरी करत त्याच्या अंगावरील नोटा चोरून नेल्या आहेत. ही घटना आळंदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी बाळकृष्ण तात्याबा कोळेकर ( वय ५३, रा. चाकण ) यांनी बबन महादू कोळेकर ( वय ६० ), सिताराम महादू कोळेकर ( वय ६५ ), दत्तात्रय विठोबा कोळेकर ( वय ६० ) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. २४ रोजी चाकण येथील श्री भानोबा देवाच्या गाभाऱ्या मधील देवाच्या अंगावरील ५० व १०० च्या नोटा असे एकूण २,७०० रुपये चोरून नेताना आढळून आले आहेत.ही मालमत्ता फिर्यादी व मंदिरातील विश्वस्थ हे देखरेख करतात.त्यांच्या संमती शिवाय आरोपी चोरी करून नेताना दिसून आले आहेत.
आरोपींवर भादवी कलम ३७९,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार टोके हे करत आहेत.












