पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २६ : मुंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत वठारे माळा येथे किराणा मालाच्या दुकानातील रोकड चोरणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवार (दि.२२) रोजी घडली होती. चंद्रकांत राजू जाधव (वय २४), राहुल ईश्वर सितापुरे (वय २९ रा.दोघे सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपी हे दुकानात कोणी नसताना काउंटर मधून रोख रक्कम चोरून फरार झाले होते. मुंढवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींना पकडले. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीं विरोधात भा.द.वि कलम ३८०,३४ अंतर्गत मुंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,पोलीस उप आयुक्त परी-५ श्रीकांत देशमुख,सह पोलीस आयुक्त अश्विनी राख, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे, प्रदीप काकडे,सह पोलीस निरीक्षक विलास सुतार,संदीप जोर,पोलीस अंमलदार दिनेश राणे,महेश पथक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील,स्वप्नील रासकर, यांनी केले आहे.
किराणा मालाच्या दुकानातील रोकड चोरणाऱ्याला अटक












