पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : तरुणीचे लग्न झालेले आहे ही बाब माहीत असूनही मित्राने तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला असल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने अक्षय अंकुश निरगुडे ( वय २९, रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव ) याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
आरोपी हा फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारा त्यांचा मित्र असून फिर्यादी यांचे लग्न झाले आहे हे त्याला माहीत होते.तरी देखील वारंवार कॉल आणि मॅसेज करून तू माझ्याशी लग्न कर, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे, तू माझ्याजवळ ये, तुझे लग्न झाले आहे तरी मला काही फरक पडत नाही, जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझे आई व आजोबा इथेच राहतात, त्यांना मी काहीही करेल अशा प्रकारे कॉल वर आणि प्रत्यक्षात भेटून सुद्धा धमकावत होता. २०२३ मध्ये फिर्यादी गरोदरपणात हॉस्पिटल मध्ये जात असताना आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या मनास शरम वाटेल असे कृत्य केले आहे.
आरोपीवर भादवी कलम ३५४ ( ड ),५०६,५०७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक म्हैसाळे हे करत आहेत.












