गेवराई/प्रतिनिधी
शहरालगतच्या बायपास वर रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान शहरातील एक युवक चहा पिण्यासाठी गेला होता. त्याला वाळूच्या हायवाने जोराची धडक दिली. यात त्याचा जागिच मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी मध्य रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
परेश दशरथ नेमानी (वय 35 वर्ष) रा. धनगर गल्ली गेवराई असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री बीडकडून गेवराईकडे जात असताना वाळूच्या रिकाम्या हायवाने त्याला जोराची धडक दिली. यात त्याचा जागिच मृत्यू झाला आहे. दरम्यान हायवा व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती असून संबधीतांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
वाळूच्या हायवाने तरुणाला चिरडले












