पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : काल दि. 30 रोजी पोयम कट्टा यांच्या तर्फे भावार्थ बुक कॅफे, कर्वे रोड, कोथरूड येथे ओपन माईक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व कवींनी आपल्या कवितांनी या कार्यक्रमास चार चांद लावले होते.
पोयम कट्टा हा मंच गेली सहा वर्षांपासून कवींसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. नवीन कवी घडवण्यासाठी लागणाऱ्या विविध ऑफलाईन तसेच ऑनलाईन प्रकारचे उपक्रम पोयम कट्टाच्या वतीने आयोजित केले जातात. यात कवींना कविता, गजल, जुने नवीन प्रसिद्ध साहित्यिक आणि साहित्याची माहिती व प्रशिक्षण दिले जाते.
पोयम कट्टा गेली सहा वर्ष कवितांच्या मुक्त मैफिली आयोजित करून नवोदित कवींना कवितेचे अनेक कार्यक्रम उपलब्ध करून देत आहे. तसेच इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबच्या माध्यमांतून अनेक कार्यक्रम व साहित्य आणि साहित्यिकांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोचवत आहे. आणि मराठी साहित्याला नवीन कवी देण्याचा हेतू मनात ठेवून सतत कार्यरत आहे.
पोयम कट्टाची स्थापना २०१८ साली मुंबईत मितेश वळंजू रोहित भोसले यांनी केली. पोयम कट्टाची सध्या कार्यरत टीम मितेश वळंजू, विश्वास भोसले, यशवंत दिडवाघ यांनी सर्व कवींच्या कवितांचा पुण्यात मुक्त काव्य वाचन कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमामध्ये कवी दिनेश चौधरी, अथर्व देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, स्वप्नील कांबळे, वायलेट कवन,अपूर्व जांभेकर, मनोज कुलकर्णी, प्राजक्ता क्षीरसागर, डॉ. क्रांती वाघमारे, हर्षल जोशी, संजय इजारदर, धनंजय कांबळे यांच्या सह पंधरा कवींनी त्यांच्या नानाविध विषयांवरील सुंदर कवितांचे सादरीकरण केले.












