पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून फिल्मी स्टाईलने धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोरेगांव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
श्रीनाथ यल्लप्पा शेंडगे ( वय २५ वर्षे, रा. मु. उंबरे ( वेळापुर) पो. नेवरे, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर ) असे आरोपीचे नाव असून व्यापाऱ्यास धमकी दिल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.त्याच्याकडे गुन्हयात वापरण्यात आलेला मोबाईल फोन व व्होडाफोन / आयडीया कंपनीचे सिमकार्ड हे ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री संदिप कर्णिक, मा.अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा.पो.आयुक्त गुन्हे श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर. म. सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोउपनि नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, उज्वल मोकाशी, संजय जाधव, उत्तम तारु, साधना ताम्हाणे, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख, निखिल जाधव, विनोद चव्हाण व नागनाथ राख यांनी केलेली आहे.












