पुणे प्रतिनिधी
पुणे दि. १२ : ब्लु डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीच्या गाडीतून ॲपल कंपनीचे इलेक्ट्रॉनिक डिवाइस चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (दि. १०) रोजी सहकारनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अभिजित अरुण जाधव (वय २३ रा. मु.पो.मुकादम वाडी, कुरकुंभ,ता.दौंड,जि. पुणे),अक्षय संभाजी निबाळकर वय २३ रा. मु.पो. माळद,ता.दौंड,जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. सदर आरोपीने पद्मावती ट्रॅव्हल्स येथे चोरीचे ॲपल कंपनीचे इलेक्ट्रॉनिक डिवाइस विक्रीसाठी आणून ग्राहक शोधात असल्याची माहिती युनिट-२ कडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व अमोल सरडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून चार लाख ९० हजार रुपये किंमतीचे ५ आय फोन,१ आय पॅड, ३ डिजिटल घड्याळ असा एकूण मुद्दे माळ जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हे ब्लु डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीत ड्रायवर, क्लिनर असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कंपनीचा माल घेऊन जात असताना प्रवास दरम्यान आरोपीने चोरी केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीं विरोधात भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिसांकडे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, युनिट-२ सह पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलीस अमलदार गजानन सोनुने, पुष्पेन्द्र चव्हाण, अमोल सरडे, संजय जाधव, साधना ताम्हणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, निखिल जाधव, नामदेव रेणूसे, मोहसीन शेख, शंकर नेवसे, राहुल राजपुरे, गणेश थोरात, नागनाथ राख यांनी केले आहे.












