पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : दुचाकीस्वाराने एका इसमाचा मोबाईल चोरी करून नेला आहे. ही घटना सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका इसमाने दोन दुचाकीस्वारांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी हे नऱ्हे येथील बस स्टॉप जवळ बसची वाट बघत उभे होते.त्यावेळी मागून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी फिर्यादी यांच्या हातात असलेला साठ हजार किमतीचा मोबाईल चोरून नेला आहे.
आरोपींवर भादवी कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी हे करत आहेत.












