पिंपरी : निगडी येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्व हरिदास नायर यांच्या स्मरणार्थ
लायन्स क्लबस् इंटरनॅशनल व श्रीकृष्ण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट निगडी व मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
यावेळी ९५ जणांनी रक्तदान केले.
प्रांतपाल विजय भंडारी म्हणाले कि,रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची जी परंपरा
स्व.हरिदास नायर यांनी मंदिराच्या माध्यमातून सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराचे यंदा ३५ वे वर्ष आहे. हे वडिलांचे कार्य त्यांचा मुलगा हर्ष आणि त्यांचे कुटुंबीय नेटाने पुढे नेत आहे.हे याचे यश आहे.
या निमित्ताने पिंपरी चिंचवड, मावळ व चाकण भागातील लायन्स पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने लायन्स व रोटरी क्लब यांचे एकत्रित सहभागातून एक अद्ययावत नेत्र तपासणी फिरता दवाखाना वाहन चे लोकार्पण लायन्स चे जिल्हा प्रांतपाल विजय भंडारी, रोटरी च्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर लायन्स चे प्रांतपाल विजय भंडारी, रोटरीच्या माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी समवेत, लायन्स चे माजी प्रांतपाल दिपक शाह शरदचंद्र पाटणकर, बाळकृष्ण जोशी, लायन्सचे प्रांतीय मुख्याधिकारी श्याम खंडेलवाल, खजिनदार राजेंद्र गोयल, सुनील चेकर, आनंद आंबेकर, शैलेश शाह, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र सांकला लायन्स विभागीय अध्यक्ष धनराज मंगणानी, विक्रम माने, शिरीष हिवाळे, प्रीतम दोशी, कल्पना मांजरे, प्रशांत गोमकाळे तसेच विविध क्लब चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
लायन्स नेत्र तपासनी फिरता दवाखाना व त्या द्वारे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या विषयी शैलेश शाह यांनी माहिती दिली.
रक्तदान शिबिराचे संयोजन हर्ष नायर व रश्मी नायर तसेच आधार ब्लड बँक चे मकरंद शहापुरकर व त्यांची टीम यांनी केले होते.सूत्रसंचालन राजीव कुटे यांनी केले.तर आभार हर्ष नायर यांनी मानले.












