पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२३ : मनपाच्या गाडीवर दररोज काम नेमूण देण्यासाठी चार हजार रूपयाची लाच मागितल्या प्रकरणी पीएमपीएमएलच्या वाहनाचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पांडुरंग साधू लोणकर वय ५७ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि फिर्यादी हे खाजगी कंत्राटी वाहन चालक असून सदर आरोपीने मनपाच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी लाच मागितली. या प्रकरणाची पोलिसांनी शहानिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (दि.२२) ऑगस्ट रोजी शंकर शेठ रोड,चहाची टपरी समोर लाच घेताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींवर भादवी कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विरनाथ माने करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांनी केले आहेत.
पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्या प्रकरणी कारवाई












