पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २८ नवोदय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने मल्याळी बांधवांचा नववर्षारंभ म्हणजेच ओणम चा सण मोठ्या उत्साहात काळेवाडीमध्ये साजरा करण्यात आला.
शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप,बालाजी इन्स्टिट्यूटचे संचालक बिजू पिल्ले,ज्येष्ठ विचारवंत राजेश नादापुरम, एसएनजीएस पुणेचे अध्यक्ष जे. चंद्रन, अशोकन नायर, माजी नगरसेवक बाबू नायर, नवोदय चे अध्यक्ष विजय कर्ता, उन्नीकृष्णन वाक्नाड, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, सजी व्हर्की, महेश्वर मराठे, माजी नगरसेवक, अमित गावडे,राजेश पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मल्याळी कलाकारांनी भरतनाट्यम, मोहिनी अट्टम, कथ्थक नृत्य असेकला प्रकार सादर केले . यावेळी सादर केलेला नागम नृत्याने कार्यक्रमास रंगत आणली.बिजू पिल्ले म्हणाले कि,सत्य ज्ञान, समाधानखोटे माणूस बोलतो मात्र देवाकडे सत्य असते.
देवावर विश्वास ठेवा.विविधतेत एकता असलेला भारत देश आहे.श्री नादापुरम म्हणाले कि, गायत्री मंत्र फायदा होतो. शांतता ठेवण्याची गरज आहे.हिंदू हि जात नाही तर हि एक विधायक सिस्टीम आहे.
जगताप म्हणाले कि, गेली २५/ ३० वर्षापासून मल्याळी समाज येथे वास्तव्यास आहे. त्यांचे शहराच्या विकासात योगदान आहे. हे योगदान असेच राहू द्या.ओणमच्या सणाचे प्रतीक असलेले फुकलम म्हणजेच फुलांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी शहरातील सुमारे अडीच हजार मल्याळी बांधव सहभागी झाले होते.सूत्रसंचालन उन्नीकृष्णन वाक्नाड यांनी तर आभार विजय कर्ता यांनी मानले.












