पिंपरी : मा. नगरसेवक अनंत सुभाष कोऱ्हाळे चिंचवड विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शनिवार (दि २) रोजी या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते.
या कार्यालयाचे उद्घाटन मा. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नगरसेवक विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर हे होते.
यावेळी कोऱ्हाळे यांना जन्मदिनानिमित्त व कार्यालयाच्या उदघाटन झाल्या प्रसंगी दैनिक राज्य लोकतंत्राचे संपादक मा. श्री गणेश मोकाशी व सहकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच भविष्यात त्यांची भूमिका व पुढील वाटचाल तसेच येणाऱ्या विधानसभेत त्यांना भरगोस यश मिळावे यासाठी दैनिक राज्य लोकतंत्र परिवाराकडून कोऱ्हाळे यांना सदिच्छा भेट देऊन मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.












