पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १३ : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य पुंडलिक रसाळ हे होते. यावेळी त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे, जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण आहे, आपण देशाची प्रॉपर्टी आहोत. मुळात माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. त्याने सदसदविवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. जागेपणी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी माणसाचा जन्म आहे. असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिले पाहिजे. चांगला विचार करायला शिकले पाहिजे, हीच निरामय जीवनाची गुरुकिल्ली आहे. तेव्हा आत्महत्या जीवनातील संकटांपासून पळ काढण्याचा अंतिम पर्याय नाही. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर महादेव सरोदे हे होते. त्यांनी आत्महत्या ही विनाशकरी आहे. आत्महत्या करणार व्यक्तींच्या नात्यांवर त्याचा दुरगामी परिणाम होतो. त्यामुळे जीवनातील कोणत्याही संघर्षाला, संकटाला सारासार विवेकबुद्धीने समर्थपणे सामोरे गेले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब पवळ यांनी तर आभार रूपाली जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली खेडकर यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचर्य शहाजी मोरे, मृणालिनी शेखर, नीलकंठ डहाळे व विद्यार्थी उपस्थित होते.












