पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१८ : सहकारनगर परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज ऊर्फ डमऱ्या राजू गायकवाड (वय २२ रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती, सहकारनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४२ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.
गायकवाड हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. सहकारनगर व बंगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही साथीदारांसह लोखंडी पालघन, कोयता,बांबू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये आरोपी विरुधात सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला होता.
सदर आरोपी विरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्ष करीत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगिरी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मावळे व पी.सी.बी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी खोबरे यांनी पार पडले आहेत.












