पुणे प्रतिनिधी:
दि.२१ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात भारतीय लष्करातील ५०० अधिकारी व जवान बाप्पाची आरती आज सायंकाळी ५:०० वाजता करणार आहेत.
भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदन कमांड मधील ५०० अधिकारी व जवान ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती करण्यास व दर्शन घेण्यास येणार आहेत. पुण्यात असलेल्या २४ मराठा बटालियन, जाट बटालियन आणि महार बटालियन चे जवान व कुटुंबीय सहभागी होणार आहेत.












