पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : आपण दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करत असतो. याच ऑनलाईन व्यवहारावर सायबर चोरट्यांची बारीक नजर असते. अशाच काही घटनेमध्ये नागरिकांसोबत ऑनलाईन व्यहारातून फसवणुक झाल्याच्या तक्रारी लोणीकंद पोलिसात दाखल झाल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सायबर चोरट्यांवर वचक बसवून नागरिकांचे पैसे परत मिळवून दिले. सदर घटनेत (दि.४ जुलै) रोजी तक्रार दाराचे क्रेडिट कार्ड द्वारे ८८ हजार तीनशे सदुसष्ठ रुपयांची फसवणूक झाली होती. तसेच (दि.२३) ऑगस्ट मध्ये महिलेची ४ हजार रुपये तर (दि.६) सप्टेंबरला फोन-पेय मधून बोलत असलत्याचे सांगून तक्रारदार इसमाची ६ हजार पाचशे रुपयांची फोन पेयवर रिवार्ड देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती. या तिन्ही घटनेचा तपास करत सायबर पोलिसांनी नागरिकांचे पैसे परत मिळवून दिले.
ऑनलाईन फसवणूक झाल्यास काय करावे
* ऑनलाईन फसवणूक झालेल्या व्यक्तीने सर्व प्रथम https://cybercrime.gov.in या संकेत स्थळावर तक्रार दाखल करावी.
* ऑनलाईन तक्रार दाखल करत असताना कोणतीही अडचण आल्यास १ ९ ३ ० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावे.
* संपूर्ण माहिती भरल्या नंतर सदरची एक प्रत पोलिसांना देण्यात यावी.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ – ४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद सायबर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार पिलाणे सागर, पाटील महिला पोलीस अंमलदार कीर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केले आहे.












