पुणे प्रतिनिधी
पुण्यात निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दि.२९ सायंकाळच्या सुमारास सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ ते ५ जणांच्या टोळक्यांनी वार करत तरुणाची हत्या केली.
विजय ढुमे असे हत्या झालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे नाव आहे. सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमधून बाहेर येताच टोळक्यांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. विजय हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा असून त्याचे अनेक बड्या पोलिस अधिकार्यांशी मैत्रीचे संबंध होते. तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते.
आरोपीं विरोधात भा.द.वि. कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,सह महाराष्ट्र पोलीस कायदा ३७/१ सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने घडली याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजूकर करीत आहेत.












