पुणे प्रतिनिधी
पुणे 30 : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. रात्री 8.52 च्या सुमारास मुंबई लेनवर हा अपघात झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवर महामंडळाची बस बेकायदेशीर रित्या थांबलेली होती. चालकाला बस हलवताना दिशा दाखवण्यासाठी कंडक्टर रात्री हातात कोणते इंडिकेटर न घेता रस्त्यावर उभा होता. ज्या ठिकाणी बस थांबलेली होते त्या ठिकाणी तीव्र वळण असल्याने पाठीमागून येणाऱ्या कंटेनर ट्रकला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि रस्तावर उभ्या असलेल्या कंडक्टर शिवराज माळी यांना धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
केबिनमध्ये अडकलेल्या कंटेनर चालकाला बचाव पथकाने बाहेर काढले असून त्याला उपचारासाठी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.












