पुणे प्रतिनिधी
चिखली येथील पवार वस्तीमध्ये असलेले मेहर ऑटो पार्ट इंडस्ट्रीज या कंपनी मध्ये काम करणारा २० वर्षीय मजूर रवींद्र बाबुराम जयस्वाल हा (दि. १२) रोजी कामावर असताना कंपनीचे मालक दीपक तिवारी, मॅनेजर प्रेमसिंग व सुपरवायझर परवेज यांनी रवींद्र याला प्रेस मशीन ऑपरेटिंगचे कोणतेही ज्ञान नसताना सुरक्षेविषयी साधने व सुविधा न देता त्याला हायड्रोलिक मशीन चालविण्यास सांगितले.
रवींद्र हा मशिनवर काम करत असताना प्रेस मशीनचे डाय त्याच्या हातावर पडून त्याची तीन बोटे कापली गेली होती. या अपघातात जखमी झालेल्या रवींद्र जयस्वाल याला जवळच्या विध्य ग्रेस या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर हॉस्पिटलचे तत्कालीन कामावर रुजु असणारे डॉ. यांनी या संदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती दिली.
एम.एल.सी. करणे गरजेचे असतानाही तसे न करता त्याचप्रमाणे उपचाराची कागदपत्रे बदलून कंपनीचे मालक दीपक तिवारी यांची मदत केली. सदर संदर्भातील तक्रार अपघातामध्ये जखमी झालेले रवींद्र जयस्वाल यांनी (दि.१० आक्टोबर) चिखली पोलीस स्टेशनला दिली. मेहेर ऑटो पार्ट इंडस्ट्रीज या कंपनीचे मालक दीपक तिवारी, मॅनेजर प्रेमसिंग, सुपरवायझर परवेज व विद्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३३८,२८७,१७६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक न्यामणे हे पुढील तपास करत आहेत.












