मुंबई | प्रतिनिधी
पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री शाम चांडक यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नुकतीच निवड झाली आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीशाचा पदभार एस. सी. चांडक पाहात होते. न्यायाधीश चांडक यांनी १९९४ मध्ये विधी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी वकील व्यवसाय सुरू केला.
त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २००२ ते मे २००८ पर्यंत ते अंजनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून काम पाहिले. मे २००८ मध्ये त्यांची मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विविध न्यायालयात न्यायदानाची जबाबदारी पार पाडली. आता श्री शाम चांडक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारणार आहेत..












