पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १४ : नागपूर येथील बातमी छापण्यासाठी माहिती घ्यायला गेलेल्या पत्रकारास बेला पोलिस स्टेशन मधील पोलीस शिपायाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी दैनिक लोकशाहीचे पत्रकार दिलीप धिमे आणि त्यांचे सहकारी राजेंद्र सूर्यवंशी यांना एका पोलिस शिपायाकडून मारहाण करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रकरणातील आरोपी याला पोलिस शिपाई जाकीर शेख याच्याकडून मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणाची शहानिशा करून बातमी करण्याच्या अनुषंगाने फिर्यादी माहिती घेण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपी जाकीर शेख याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला विचारण्यात आलेले प्रकरण हे विनयभंगाचे असून त्यामध्ये आर्थिक देवाण – घेवाण झाल्याच्या चर्चा सुद्धा कानावर पडत होत्या. तसेच या प्रकरणातील आरोपीला जाकीर शेख यांनी मारहाण सुद्धा केली होती.या प्रकरणाची माहिती घेऊन बातमी प्रकाशित करण्याच्या विचारात असणाऱ्या पत्रकारांवर आरोपीने हल्ला केला.
सध्या देशातील पत्रकार हे सुरक्षित राहिले नाहीत.अनेक स्तरांवरुन बातमी प्रकाशित करून सद्यस्थिती समोर आणली जाते म्हणून पत्रकारांवर हल्ला करणे कितपत योग्य आहे ? लोकशाहीचा चौथा स्तंभच जर धोक्यात असेल तेही पोलिसांकडून तर जनतेने कोणाकडून अपेक्षा ठेवायची ? वरिष्ठांनी आरोपी शिपाया विरोधात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून त्वरित त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेला पत्रकार संघाकडून होत आहे.












