पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १८ : ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ट्रकचालक आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना स्वामीनारायण मंदिरासमोरील कोल्हापूर पुणे हायवे रोडवर नऱ्हे येथे घडली आहे.
याप्रकरणी सुनील कोळी या २७ वर्षीय तरुणाने सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा कात्रज बोगदा येथून त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून स्वामीनारायण मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर अचानक ट्रकची लेन बदलून पाठीमागून येणाऱ्या फिर्यादी यांच्या ट्रकला जोराची धडक दिली. यामुळे आरोपी याच्या ट्रकचा कंटेनर पलटी होऊन ट्रकचे केबिन आत मध्ये दबले गेले. त्यामुळे आरोपीचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात होऊन केबिनला आग लागली आणि केबिन मधील प्रवासी यास्मिन पठाण, तिचा मुलगा अमन पठाण, ट्रक क्लीनर सोमनाथ मलाप्पा निळे आणि ट्रक चालक यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
स्वतःच्या तसेच इतर तीन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीविरोधात भादवि कलम ३०४ ( अ ),२७९,३३७,३३८,४२७ मो. वा. का. क ११९/१७७,१८४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे करत आहेत.












