तृत्तीयपंथीयांसाठी असलेल्या जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे ३ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या समस्या,तक्रारीचे निवारण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येतो.
प्रस्तावासोबत कार्यपरिचय पत्र, शैक्षणिक कागदपत्रे, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाबाबतची छायाचित्रे तसेच पोलीस विभागाकडील चारित्र्य पडताळणी अहवाल सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.












