कोपरगाव,- पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परमपूज्य आत्मा मालिक गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दि. १५ ते २५ ऑक्टोबरदरम्यान सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
दैनंदिन जीवनात अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याचा घोका लक्षात घेऊन भक्तांना प्रवासादरम्यान आरोग्याचा कोणताही धोका होऊ नये म्हणून हॉस्पिटलतर्फे रुग्णवाहिका सेवाही शिबिरामध्ये मोफत देण्यात आली आहे. आत्मा मालिक हॉस्पिटलच्या या अभिनव उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ आरोग्य तपासणी शिबिर न घेता भक्तांना लागणारी सर्व औषधे मोफत देण्याची व्यवस्था करून आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
आत्मा मालिक ध्यानपीठ जंगली महाराज आश्रय ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आत्मा मालिक माऊलींचे विचार हे जनसेवेचे आहेत. तेच विचार प्रत्यक्षात कृतीतून करण्याचे काम सूर्यवंशी करीत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजनेचा विस्तार भाविकांसाठी वाढवण्यात आलेला आहे. आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजनेची माहितीदेखील भाविकांना या शिबिरात दिली जात आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. जर काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा
अधिक माहिती हवी असेल तर जनसंपर्क अधिकारी अक्षय कंड्रे यांच्याशी ९१५६०३३२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगितले.












