
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : आज म.न.से. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सत्यशोधक चित्रपटाच्या टीमने सदिच्छा भेट दिली.
ह्या भेटी दरम्यान राज ठाकरेंनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टिझर बघितला आणि ह्या चित्रपटा विषयी चर्चा, मार्गदर्शन केले.
मराठी माणसांनी बनविलेली ही सुंदर कलाकृती आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलें यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायाचे आश्वासन दिले.
राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या यशासाठी सर्व टीम ला शुभेच्छा दिल्यात. यावेळी चित्रपट निर्माते प्रविण तायडे , आप्पा बोराटे , सह-निर्माते बाळासाहेब बांगर, नगरसेवक सचिन चिखले , जयशिंग भाट आणि सत्यशोधक मित्र परिवार उपस्थित होता.
समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स प्रोडक्शन प्रा. ली. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतीक्षा बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘सत्यशोधक हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येईल.
अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे हे मुख्य भूमिकेत दिसतील तसेच, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी , अमोल बावडेकर , राहुल तायडे , अनिकेत केळकर , सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ह्या चित्रपटाला अमित राज यांनी सुमधुर अशे संगीत दिले आहे तसेच समीर फातर्पेकर यांनी ह्या चित्रपटाला पार्श्व संगीत दिले आहे. हा एक भव्य दिव्य अत्याधुनिक मराठी चित्रपट बनला आहे आणि लवकरच चित्रपट गृहात आपल्या भेटीस येत आहे.












