पुणे | प्रतिनिधी
पुणे,दि. २४ : 19 फेब्रुवारी 2023 रोजी देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत बालविवाहाचा प्रकार घडला होता, त्या वेळी तत्कालीन वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकांनी बालविवाहाचे गंभीर प्रकरण लपवले होते. तिने तिचे कर्तव्य बजावले नाही आणि तिच्या बेकायदेशीर कृत्यामुळे बाल अत्याचार आणि POCSO अंतर्गत गुन्हा घडला होता असे रमेश यांनी नमूद केले आहे.
रमेशन यांनी पुण्याच्या बाल कल्याण समितीकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आली होती, आणि त्यानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये देहूरोड पोलीस स्टेशनला (गु.रे. नं. ४१६/२०२३) तक्रार नोंदवण्यात आली.
मात्र, सविस्तर माहिती आणि पुरावे त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश देऊनही देहूरोड पोलिस संबंधित आरोपींना अटक करण्यात व सखोल तपासात दिरंगाई करत आहेत ज्यामुळे POCSO मधील गंभीर प्रकरणाचे गांभीर्य कमी होऊ शकते, असे रमेशन यांनी सांगितले.
या आधी देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी या नात्याने त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरटीआय व सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून येत्या काही दिवसांत बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती दिली आहे.












