मराठा समाजातील सर्वच व्यक्ती गर्भश्रीमंत नसून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देणे ही राज्य सरकारची व केंद्र सरकारची जबाबदारी असून मनोहर जरांगे यांच्या केसाला जर धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष डी. के. साखरे यांनी दिला.
मराठा आरक्षण लढ्याचे सरसेनापती मनोहर जरांगे पाटील यांचे उपोषणाला पाठिंबा दर्शविण्याकरिता आज मंगळवेढा बंदप्रसंगी साखरे बोलत होते. पुढे बोलताना साखरे म्हणाले की, जरांगे पाटील हे प्राणपणाला लावून आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा असलेला पाठिंबा जगजाहीर असून न्यायासाठी होणारी युद्ध ही अटळ असून तिथे विजय मिळेपर्यंत लढावेच लागते.आरक्षणाच्या या लढ्यात सर्वच समाजबांधव मराठा समाजासोबत असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.
यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे,प्रा. शिवाजी काळुंगे, दिलीप जाधव, प्रा. येताळा भगत, ज्ञानेश्वर (माऊली )कोंडूभैरी, मुरलीधर दत्तू,दिगंबर भगरे ,राजाभाऊ चेळेकर, संभाजी घुले, चंद्रशेखर कोंडूभैरी, अजित जगताप, ऍड. राहुल घुले,दत्तात्रय वरपे, राहुल सावंजी, दत्तात्रय जाधव यांच्यासह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.












